सरळगाव येथे पशुज्ञानाची महाजत्रा

लेखक- डाॅ. दिलीप धानके 

पशुसंवर्धनातून ग्रामसमृध्दी हे उदिष्ट समोर ठेऊन ठाणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम,शेतकरी प्रशिक्षण शिबीरे,व विविध शासकीय योजनांचे माध्यमातून जनजागृती घडवत आहे.शेतकरी पशुपालकांना सक्षमतेने पुढे आणण्यासाठी त्यांचे ज्ञान आणि कौशल्यामध्ये सुधारणावादी धोरण आखत आहे.पशुपालकांचे दारात जाऊन उत्तम संवादातून दुग्धक्रांतीची पशुसंजीवनी देण्याचा दैनंदिन उपक्रम सतत सुरुच आहे. पशुसंवर्धन विभाग लोकाभिमुख व्हावा यासाठी प्रचार प्रसिद्धी अभियानही अनेकवेळा राबविले गेले.प्रत्येक तालुक्यात एक पशुपालक प्रशिक्षण शिबीर घेतले.मुंबईला दुध पुरविणारा हा ठाणे जिल्हा आहे. तसेच शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायातून देखील अर्थक्रांती व स्वयंरोजगार याच पशुसंवर्धन विभागाचे प्रेरणेने निर्माण होत आहे. आणि म्हणूनच ठाणे जिल्ह्यात शेतकरी हितार्थ पशुपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने यावर्षी जनावरांचा प्रसिद्ध बाजार असलेल्या सरळगाव ता.मुरबाड जि.ठाणे येथे रविवार दिनांक १मार्च २०२०रोजी सकाळी १०.३०वाजता 
 एक दिवसाचे भव्य दिव्य जिल्हा स्तरीय पशुपक्षी प्रदर्शन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनीलजी केदार साहेब  व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे उपस्थिती मध्ये आयोजित केले आहे. या प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यातील आमदार खासदार यांचेसह पशुसंवर्धन विभागातील उच्चस्तरीय अधिकारी यांचे मार्गदर्शन होत आहे व ठाणे जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी,पंचायत समिती पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. आणि विषेशतःसरळगाव येथील नेवाळपाडा मैदानावर एक भव्य सभामंडपामध्ये ४५  विविध माहितीचे स्टाॅल लावले आहेत.पशुसंवर्धन विषयक माहीती ज्ञानाचे महापर्व शेतकरी पशुपालक,बचत गट,युवा,महीला,डेअरी संस्था यांना प्रत्यक्ष अनुभवता येईल.विविध संकरीत गायी,देशी जातीवंत गीर,थारपारकर,लालकंधारी,कांकरेज,राठी ,डांगी,खिलार,साहीवाल व विशेष आकर्षण असलेली पाकिस्तानची चौलीस्थानी देशी गाय इत्यादी गायी व वळू यांच्या जाती, तसेच अधिक दुध देणारी म्हैस व रेडे तसेच शेळीपालन मधील नामवंत सिरोही,बीटल,सोजत,तोतापुरी,सुरती,तसेच उस्मानाबादी या जातीच्या दुर्मिळ शेळया एकाच जागेवर पहावयाला मिळणार आहे तसेच विवीध जातीचे घोडे त्याचप्रमाणे कुक्कुटपालन मधील कोंबड्याच्या जाती देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.तसेच या प्रदर्शनात पशुखादय,पशुऔषधी,गोशाळा औषधी,चारा साक्षरता तसेच स्वयंम योजना,शासकीय योजना,चारा पिके तसेच दुध धारा काढणारी मिल्क मशीन,पशुसंवर्धन साहित्य व यंत्र उपकरणे अशा विविधतेने नटलेल्या विषयांचे अभ्यासपूर्ण दालने सजली आहेत.व खासमखास विविध जातीचे श्वानांचा रॅम्पवर देखणा डाॅग शो यासारखा पशुज्ञानाचा महाखजीनाच शेतकरी पशुपालक व सुशिक्षित बेरोजगार युवक व महीला यांना या प्रदर्शनात लुटता येईल.ठाणे जिल्ह्यात हे एक ऐतिहासिक असे जिल्हा स्तरीय पशुपक्षी प्रदर्शन होत आहे. ठाणे जिल्ह्यात शहापूर व मुरबाड,भिवंडी,कल्याण,अंबरनाथ  या तालुक्यात आता दुग्धव्यवसाय मोठया प्रमाणात यशस्वी होत आहे तसेच अनेक युवक शेळीपालन व गावरान देशी कुक्कुटपालनाकडे आकर्षित झाला आहे या सर्वांना दिशा देणारे असे हे मार्गदिप पशुपक्षी प्रदर्शन आहे.सरळगाव हे मुरबाड नगर रस्त्यावर वसलेले एक मध्यवर्ती ठिकाण आहे.शहापूर व मुरबाड तालुक्यातील शेतकरी वर्गाची ही एक मोठी बाजारपेठ आहे. किन्हवली व टोकावडे परीसरातील अनेक लोक येथे खरेदी विक्रीसाठी येतात.याच गावात दर आठवड्याला मंगळवारी गुरांचा मोठा बाजार भरतो.हे ठिकाण शेतकरी लोकांची एक वहीवाट असल्यानेच पशुसंवर्धन विभागाने 
ठाणे जिल्ह्यातील शेतकरी पशुपालकांना व जनतेला एक महासंधी निर्माण करुन  दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा दिपालीताई पाटील, उपाध्यक्ष सुभाषदादा पवार,कृषी पशुसंवर्धन सभापती किशोरजी जाधव,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने साहेब,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ धुमाल साहेब .  व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार यांचे मार्गदर्शनानुसार आयोजक समिती विविध पातळीवर कार्यरतआहे.जिल्हा परीषद पदाधिकारी,पंचायत समिती पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील् सर्व जिल्हा परिषद सदस्य स्थानिक आमदार किसनराव कथोरे साहेब यांचे सुद्धा मार्गदर्शन घेऊन रविवारी १मार्च २०२०रोजी सरळगाव(नेवाळपाडा)येथे पशुज्ञानाची महाजत्रा आयोजित केली आहे. या प्रदर्शनातून अनेकांना पशुधन उन्नतीची नक्कीच प्रेरणा मिळेल व त्यातून ठाणे जिल्ह्यातील हजारो तरुण व महीला पशुसंवर्धन विषयक स्वयंरोजगारासाठी पुढे येतील. हे ऐतिहासिक प्रदर्शन म्हणजे गावखेडयातील आदिवासी कातकरी व दुग्धउत्पादन शेतकरी तसेच महीला यांना जोडणारा पशुक्रांतीचा महामार्गच ठरेल.आपल्या  ग्रामराज्याची वहीवाट पुन्हा सुरु करता येईल.या प्रदर्शनात रेखाटलेले पशुसंवर्धन विषयक उपयुक्त माहीतीचे तक्ते नक्कीच प्रेरक ठरतील.येथील एक विचार देखील माणसाची दिशा बदलू शकतो.आता नोकरीची दारे बंद झाल्याने पशुसंवर्धन हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एकमेव पर्याय शिल्लक राहीला आहे. शेतकरी सन्मानार्थ व युवा पिढीच्या भविष्यासाठी पशुसंवर्धन विभागच स्वयंरोजगार निर्माण करु शकत असल्याने असे पशुपक्षी प्रदर्शन पहाणे व माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.पंचायत समिती मुरबाड व ठाणे जिल्हा परिषद अत्यंत विनम्रपणे आपल्या स्वागतासाठी आतूर आहोत. उपस्थित सर्व शेतकरी पशुपालक यांचे स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.हे प्रदर्शन पहा,मान्यवरांचे मार्गदर्शन ऐका.तांत्रिक सेमिनार पहा व सर्व स्टाॅलला भेट देऊन इथला पशुधन महाज्ञानाचा आनंद घ्या.अशी संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. चला तर मग येताय ना सरळगाव येथे भरलेल्या पशुज्ञानाचे जत्रेला.पशुपालकांनो,युवकांनो,शेतकरी वारकरी, कष्टकरी मित्रांनो आणि माता-भगीनीनो सारेच या.यारे यारे सारेजन,अवश्य या.सहकुटुंब या.आपल्या मुलांनाही सोबत आना.शाळा काॅलेजचे विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी सुद्धा भेट दया.रविवार हा मुद्दाम आम्ही सर्वाचे सुट्टीचा दिवस निवडला आहे. अखिल जनतेला हे पशुपक्षी प्रदर्शन विनामूल्य पहाता येईल.सर्वासाठी हे प्रदर्शन खुले आहे.पशुसंवर्धन हा ग्रामविकासाचा पहिला पाया आहे हाच उदात्त हेतू ठेऊन ठाणे जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन सभापती किशोरजी जाधव साहेब यांचेच प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व जय्यत तयारी पुर्ण झाली आहे.आम्ही आपली वाट पहात आहोत.डोळे भरुन एकदा ही पशुज्ञानाची महाजत्रा पहाच.नक्कीच तुम्हाला क्रांतीचा एखादा मार्ग सापडेल.
*पशुसंवर्धनाचे महादालन*
*पहा जातीवंत पशुपालन*
*आली पशुज्ञानाची महाजत्रा* 
*चला सरळगावला जाऊ मित्रा*
लेखक-डाॅ. दिलीप धानके 
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी 
जिल्हा परिषद ठाणे 
९४२१६२२८५३