येऊर येथे विवेकानंद बालकाश्रमात समृद्ध आणि विविधतेने नटलेली पारंपारिक होळी साजरी.

 


ठाणे: मैत्री फाऊंडेशन तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे विवेकानंद बालकाश्रम येऊर ठाणे येथे संचालिका प्राची कसबेकर व ठामपा नगरसेवक दिलीप बारटक्के आणि अशोक जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिवप्रतिमेचे पूजन करून होळी महोत्सवास शानदार सुरवात झाली, प्रशांत सातपूते ता.सटाना शिवसेना संपर्कप्रमूख आणि मनोज नारकर यांनी नैसर्गिक कोरडे रंग वापरून पाणी वाचवा हा  मैत्री फाऊंडेशनचा संदेश स्मार्ट ठाणे शहरासाठी गौरवास्पद आहे. या वेळी मुलांना शालेय साहित्य वाटप रमेश यादव यांच्या हस्ते झाले. समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपारिक होळीची पूजा करून दिलीप बारटक्के याच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.येऊर येथील  पर्यावरण आणि पाणी यांचा परस्पर संबंध किती घट्ट आह म्हणून , पाणीरहित पद्धतीने कोरडी धुळवड व नैसर्गिक कोरडे रंग वापरून सर्वांनी विवेकानंद बालकाश्रमातील मुलांन बरोबर होळी साजरी केली. डी जे संगीत तालावर नृत्य केले आणि जेवन-पुरणपोळी सहभोजनाचा आस्वाद घेतला.मैत्री फाऊंडेशन तर्फे आयोजक प्रदिप पवार,रूपेश पानमंद,भिवा दळवी,नरेंद्र सोनावळे,गोपाळ धुरी जॉन बेनेटीक,गहिनीनाथ बिचकूले,बाबू होगळे,सुषमा शिरसाट,महानंदा जगताप,अनिकेत कदम यांनी होळी महोत्सवासाठी विशेष मेहनत घेतली.