सरकारनं गरिबांच्या खात्यात १००० रुपये थेट ट्रान्सफर करण्याची गरज - अभिजित बॅनर्जी


 


नवी दिल्ली : करोना विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वात वाईट परिणाम दिसून येतोय तो गरिब जनतेवर... याचबद्दल नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्ज यांनी भाष्य केलंय. या संकटाच्या काळात सरकारनं गरिबांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याची गरज असल्याची गरज बॅनर्जी यांनी व्यक्त केली.


भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ (Nobel Proze to India Origin Economist अभिजित बॅनर्जी व त्यांची पत्नी जयपूर येथील एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सरकारने कोरोना संकरात प्रत्येक भारतीय व्यक्तीला कमीत कमी एक हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले पुढील दोन महिने ही गरज लागू शकेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी मांडले शिवाय सरकारने वन पेंशन रेशन कार्ड या योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करायला हवी असेही त्यांनी म्हटले आहेर, 'सरकारनं युनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इन्कम (UBI) योजना तत्काळ लागू करण्याची गरज आहे. जन धन योजना याचंच एक स्वरुप आहे' असं इस्थर डफ्लो यांनी म्हटलंय. दोघांनीही सरकारनं जाहीर केलेल्या 'वन नेशन, वन रेशन कार्ड' योजनेचं कौतुक करतानाच त्याच्या अमलबजावणीची गरज व्यक्त केली.